दृष्टीकोन
दृष्टीकोन :-
=======================
फक्त वाचु नका तरआचरणात आणा
======================
आपण नाटक पहायला गेलो तर पुढची सीट मागतो आणि सिनेमा पहायला गेलो की मागची. तुमचं जगातलं स्थान असंच सापेक्ष असत...!
ते अविचल कधीच नसतं...!
साबण बनवायला तेल हा घटक जरूरी असतोे आणि तेलाचा डाग काढायला साबणच लागतो..! हा अटळ विरोधाभास आहे...!!
जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात...!
वेडीे माणसं आणि लहान मुलं !
चांगल्या कामासाठी ध्येयवेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलांसारखा त्याचा आनंद घ्या...!
जगण्याचा आनंद घ्या...!
" जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं...""
काचेला " पारा " लावला की,
आरसा तयार होतो. पण..
लोकांना "आरसा " दाखवला की,
त्यांचा " पारा " चढतो.
"आरसा तोच असतो "
फक्त त्यात " हसत " पाहिले की,
आपण " आनंदी " दिसतो,
आणि " रडत " पाहिले की,
आपण " दु:खी " दिसतो.
तसेच " जीवन " ही तेच असतं,
फक्त त्याच्याकडे आपला
पहाण्याचा " दृष्टीकोन " त्याला
" आनंदी " किंवा " दु:खी " बनवतो.
" म्हणुन.. "
" दृष्टीकोन " महत्वाचा आहे.
दृष्टिकोन बदलला की सर्वच बदलते....जीवन बदलते...
दृष्टिकोन मात्र सदसद्विवेक बुद्धीतुन असावा....
Comments
Post a Comment